अकोल्यात कार्यकर्त्यानं धुतले नाना पटोले यांचे चिखलानं माखलेले पाय; संजय राऊत म्हणाले...

अकोल्यात कार्यकर्त्यानं धुतले नाना पटोले यांचे चिखलानं माखलेले पाय; संजय राऊत म्हणाले...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोल्यातील वडेगाव येथील एका कार्यक्रमासाठी आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोल्यातील वडेगाव येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. या दरम्यान नाना पटोले यांनी शेगावचे गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी पावसामुळे या ठिकाणी चिखल झाला होता. त्या चिखलात नाना पटोले यांचे पाय माखले गेले.

यावेळी एका कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतले. हा पाय धुण्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं असेल त्यांचे पाय धुवायला पाहिजे. तर धुवू द्या ना. काही हरकत नाही. त्याचा आमचा काय संबंध आहे. असे राऊत यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com