अकोल्यात कार्यकर्त्यानं धुतले नाना पटोले यांचे चिखलानं माखलेले पाय; वाद निर्माण होण्याची शक्यता

अकोल्यात कार्यकर्त्यानं धुतले नाना पटोले यांचे चिखलानं माखलेले पाय; वाद निर्माण होण्याची शक्यता

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोल्यातील वडेगाव येथील एका कार्यक्रमासाठी आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अकोल्यातील वडेगाव येथील एका कार्यक्रमासाठी आले होते. या दरम्यान नाना पटोले यांनी शेगावचे गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी पावसामुळे या ठिकाणी चिखल झाला होता. त्या चिखलात नाना पटोले यांचे पाय माखले गेले.

यावेळी एका कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतले. हा पाय धुण्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

या प्रकाराची आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होत असून यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com