Nana Patole On BJP
Nana Patole On BJP

नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, "२०१४ आणि २०१९ मध्ये..."

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Published by :
Naresh Shende
Published on

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, लोकसभा निवडणूक देशाच्या लोकशाही आणि संविधानासाठी महत्त्वाची आहे. आमचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये जे झालं, ते आम्ही बदलणार आहोत. भाजपच्या गॅरंटीवर विश्वास नाही. राहुल गांधींच्या गॅरंटीवर विश्वास आहे. आम्ही शेतकऱ्यांना बिनशर्त कर्जमाफी केली. महिलांना दरवर्षी एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही पैसे कुठून आणणार? असं भाजप विचारतात. आमचं सरकार आल्यावर आम्ही कर रद्द करु. जनतेचा इंडिया आघाडीवर विश्वास वाढला आहे.

इंडिया आघाडीचे पहिल्या टप्प्यातील पाच उमेदवार जिंकतील. संजय निरुपम यांच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून आम्ही नाव काढलं आहे. निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. काही ठिकाणी शरद पवार यांच्याकडे उमेदवार नाहीयत. आम्ही मेरिटवर निवडणूक लढणार आहोत. भाजप आता हद्दपार होणार आहे. कोणाला किती जागा मिळणार, हा आमचा उद्देश नाही. तर निवडणुकीत जास्त जागा कशा जिंकता येतील, यावर आम्ही लक्ष देत आहोत, असंही नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com