Nana Patole Latest News
Nana PatoleLokshahi

Nana Patole: नाना पटोलेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात; म्हणाले, "सरकारने मंदिरांच्या जमिनी हडप केल्या आणि..."

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत दिवसेंदिवस राजकीय संघर्ष वाढताना दिसत आहेत.
Published by :
Naresh Shende
Published on

Nana Patole On Mahayuti Government: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत दिवसेंदिवस राजकीय संघर्ष वाढताना दिसत आहेत. महाविकास आघाडीचे नेते सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, "या सरकारने आधी सर्व मंदिरांच्या जमिनी हडप केल्या. सिद्धीविनायक मंदीर, शिर्डी देवस्थानची जमीन, विठ्ठल रूक्मिणी मंदिराची जमीन आणि आता यांना वक्फ बोर्डाच्या जमिनी हडप करून आपल्या मित्रांना विकायच्या आहेत", असं म्हणत पटोले यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला आहे.

विधानपरिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंगच्या मुद्द्यावरही पटोलेंनी भाष्य केलं. ते म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग झालं, त्याबाबतचा अहवाल देण्यासाठी वरुण सरदेसाई आले होते. आम्ही त्यांना ७ मते देऊ असे ठरले होते, पण दोन मते फुटली. याविषयीचा पडताळणी अहवाल त्यांनी दिला आहे. २ आमदारांनी गडबड केली, याबाबत माहिती घेण्यासाठी ते आले होते. त्यांच्यावर कारवाई झालेली आहे.

येत्या २० तारखेला राजीव गांधी यांची जयंती आहे. त्या निमित्त आम्ही कार्यक्रम आयोजित केला आहे. मल्लिकार्जून खरगे आणि राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसच महाराष्ट्राचे सर्व पधाधिकारीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ७ तारखेला मविआची बैठक होणार आहे. त्यावेळी जाहीरनामा आणि जागावाटपाबाबत चर्चा केली जाणार आहे. या सरकारनं महाराष्ट्राचा स्वाभिमान विकला आहे. महाराष्ट्राला लुटून ते सूरतला देण्याचं काम केलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत बोलताना पटोले म्हणाले, जागावाटपाची चर्चा झाली नाही. मविआ म्हणून पुढे जाण्याची काँग्रेसची भूमिका आहे. आमच्याकडे इनकमिंग सुरू आहे. आम्ही उमेदवारांचा सर्वे करणार आहोत. १२ तारखेपासून हा सर्वे सुरू होईल. महाराष्ट्राला घातक असणाऱ्या आणि स्वाभिमान विकणाऱ्या सरकारला सत्तेतून बाहेर काढायचं आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेला विरोध केला नाही. आम्ही हीच योजना पुढे नेऊ आणि यामध्ये भर घालू. आम्ही महालक्ष्मी योजना देणार. आमच्या बहिणीला आम्हाला लखपती करायचं आहे, असंही नाना पटोले म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com