गुजरातसाठी काँग्रेसच्या मोठ्या घोषणा; सत्ता आल्यास ५०० रुपयांत गॅस सिलेंडर आणि...
निवडणूक आयोगाने गुरुवारी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. याच विधानसभेची मुदत 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे. गुजरातमध्ये 1 डिसेंबरला 89 जागांवर आणि 5 डिसेंबरला 93 जागांवर 189 जागांवर मतदान होणार आहे. हिमाचल विधानसभा निवडणुकीसोबत ८ डिसेंबरला निकालही लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार 4.6 लाख लोक पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत झाली आहे. मात्र, यंदा केजरीवालांचे आपही सामील असणार आहे. गुजरात निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपने निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. गुजरातमध्ये यावेळी भाजप विद्यमान आमदारांपैकी सुमारे 25 टक्के आमदारांची तिकिटे कापली जाणार आहेत. गुजरातच्या निवडणुकांची घोषणा होताच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आहे.
खर्गे यांनी गुजरातमधील जनतेसाठीचा जाहीरनामाच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, जर गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, तर नागरिकांना ५०० रुपयांत एलपीजी सिलेंडर देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, ३०० युनीटपर्यंतचे वीजबील मोफत आणि १० लाख रुपयांपर्यंत उपचार आणि औषधेही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.