अमरावती लोकसभेसाठी कॉंग्रेसने जाहीर केला उमेदवार; काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनीच केली घोषणा

अमरावती लोकसभेसाठी कॉंग्रेसने जाहीर केला उमेदवार; काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनीच केली घोषणा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून नया अकोला पर्यंत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सूरज दहाट,अमरावती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून नया अकोला पर्यंत कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेदरम्यान नया अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमूख यांनी त्यांच्या भाषणाच्या सुरूवातीला मंचावर उपस्थित नेत्यांची नाव घेताना दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांचा उल्लेख अमरावती जिल्ह्याचे भावी खासदार म्हणून केला, यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेचे स्वागत केले.

तर एक एक मत काढून नवनीत राणा यांना खासदार केलं मात्र त्या खासदार फक्त आपल्याकडे दोन महिने राहिल्या असा टोला देखील काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी खासदार नवनीत राणा यांना लगावला, त्यामुळे आपल्या हक्काचा खासदार काँग्रेसच्या चिन्हाचा खासदार... केव्हाही आपण कॉलर पकडून आणू शकतो असा खासदार आपल्याला पाहिजे त्यासाठी दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे यांना आपण लोकसभेत निवडून आणू अशी घोषना काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केली,यापुर्वीसुध्दा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेसकडून बळवंत वानखडे यांना लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचे सांगितले होते, मात्र हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याला असल्याने या जीगेवर कॉंग्रेसची दावेदारू कीतपत सफल होईल? हे निवडणुकीवेळीच समजू शकेल.

काही महिन्यांपुर्वी जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या पदाधिकारी नंदकिशोर कुईटे यांनी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना अमरावती जिल्ह्यातून कॉंग्रेसची उमेदवारी देण्याची मागणी नाना पटोलेंना केली होती, त्यांच्या या मागणीमुळे जिल्ह्यातील नेत्यांमध्ये चांगलीच तारांबळ उडाली होती, मात्र प्रणिती शिंदे यांनी आपण आपला मतदारसंघ सोडणार नसल्याचे सांगून त्या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com