Raj Thackeray: खाशाबांनंतर पदक जिंकणारी पहिली मराठी व्यक्ती, राज ठाकरे म्हणाले...
पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरे पदक मिळाले आहे. स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला असून महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्यपदक पटकावलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्वप्निल कुसाळेला अभिनंदन केले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज ठाकरे म्हणाले की, "स्वप्नील कुसाळेना ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळालं, याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. खाशाबा जाधवांच्या पदकानंतर ७२ वर्षांनी पदक जिंकणारी मराठी व्यक्ती म्हणजे स्वप्नील.
स्वप्नील कुसाळे यांचं मनापासून अभिनंदन. मनू भाकर आणि सरोबजित या दोघांना देखील कांस्य पदक मिळालं याबद्दल त्या दोघांचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राची आणि भारताची पदतालिका अशीच उत्तरोत्तर वाढत जाऊ दे हीच इच्छा. जय हिंद !"
सुरुवातीला स्वप्नील सहाव्या स्थानी होता. अंतिम फेरीत एकूण आठ स्पर्धक होते. प्रत्येक नेमबाजाला 40शॉट्सची संधी होती. हे शॉट्स पूर्ण झाल्यानंतर सर्वात कमी गुण असलेले दोन खेळाडू स्पर्धेबाहेर झाले. नंतर प्रत्येक एका शॉटनंतर सुवर्ण आणि रौप्य पदक निश्चित होईपर्यंत प्रत्येक 1-1 खेळाडू बाहेर होत गेला.