Gas Cylinder Price: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर 'एवढ्या' रुपयांनी वाढ

Gas Cylinder Price: व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर 'एवढ्या' रुपयांनी वाढ

सिलेंडरच्या दरात 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सद्वारे वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी गॅसची किंमत आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीच्या ट्रेंडच्या अनुषंगाने मासिक पुनरावृत्तीमध्ये रु 6.5 प्रति 19-किलो सिलेंडरने वाढविण्यात आली. सिलेंडरच्या दरात 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.

नवीन किमती 1 ऑगस्ट 2024 पासून लागू झाले आहेत. आता विनाअनुदानित 14.2 किलोच्या इंडेन सिलेंडरची किंमत दिल्लीत रुपये 803, कोलकात्यात रुपये 829, मुंबईमध्ये रुपये 802.50 आणि चेन्नईमध्ये रुपये 818.50 आहे.

19 किलोच्या सिलेंडरच्या सुधारित किमती दिल्लीसाठी 1652.50 रुपये , कोलकातासाठी 1764.50 रुपये , मुंबईसाठी 1605 रुपये आणि चेन्नईसाठी 1817 रुपये असतील. यापूर्वी 1 जुलैपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात 30 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची सुधारित किरकोळ विक्री किंमत रुपये 1646 आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com