ताज्या बातम्या
मुंबई शहर, उपनगरांत थंडीच्या कडाक्याला सुरुवात
दोन – तीन दिवस मुंबईतील वातावरण तसेच राहणार
थोडक्यात
मुंबई शहर,उपनगरांत थंडीच्या कडाक्याला सुरुवात
कुलाब्यात किमान तापमान 23.2 अंशांवर
सांताक्रूझमध्ये 20.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
मुंबई शहर, उपनगरांत थंडीच्या कडाक्याला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या मुंबईत कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने चढ उतार सुरू आहे. त्यामुळे कधी पहाटे गारवा असतो तर दिवसा उकाडा जाणवतो.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी 33.3 तर सांताक्रूझ केंद्रात 34.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे. सांताक्रूझमध्ये 20.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती मिळत आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्याचा प्रवाह वाढल्याने प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा 12 अंशाखाली घसरला असून पुढील दोन – तीन दिवस मुंबईतील वातावरण तसेच राहणार असल्याची माहिती मिळत आहे.