ताज्या बातम्या
CNG-PNG Price : 1 एप्रिलपासून सीएनजी-पीएनजीचे दर वाढणार?नवे नियम लागू होण्याची शक्यता
महागाईमुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल होत आहेत.
महागाईमुळे सर्वसामान्यांचे चांगलेच हाल होत आहेत. सर्वसामान्यांच्या खिशाला याची चांगलीच कात्री बसली आहे. यातच दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. कच्चे तेल, फळे, भाजीपाला यासह आता सीएनजी-पीएनजीच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे दर 1 एप्रिल रोजी सुधारित केले जाणार आहेत. नैसर्गिक वायूचे दर वाढल्याने सीएनजी-पीएनजीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार 1 एप्रिल रोजी या संदर्भात निर्णय जारी करण्याची शक्यता आहे.
सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत 70 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. 1 एप्रिलपासून दर सुधारित केल्यास यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दर वाढल्यास सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच देशात उत्पादित नैसर्गिक वायूच्या किमती वाढविण्याचा विचारात आहे.