CM Shinde : पावसाळ्यापूर्वी राज्य सरकार सज्ज,  NDRF, SDRF च्या बैठकीत दिल्या 'या' सूचना

CM Shinde : पावसाळ्यापूर्वी राज्य सरकार सज्ज, NDRF, SDRF च्या बैठकीत दिल्या 'या' सूचना

मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच राज्य सरकार सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मॉन्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली,
Published by :
shweta walge
Published on

मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच राज्य सरकार सज्ज झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मॉन्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली,या बैठकीत भूस्खलनसारख्या घटना आणि मानवहानी टाळण्यासाठी कसे प्रयत्न करता येतील यावर चर्चा करण्यात आली असून त्यानुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीला NDRF, SDRF सह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून NDRF, SDRF सह महत्त्वाच्या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भूस्खलनासारख्या घटना कशा टाळता येतील, याचा आढावा घेतला. 'झिरो कॅज्युअल्टी मिशन' नुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, अन्नधान्याचा साठा, गावांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना, इतर राज्यांशी संपर्क करण्याची बाब यवरही चर्चा झाली. लोकांना संकटाबाबत जागृत करण्याचा प्रयत्न कसा करता यईल, धोकादायक इमारतीतील लोकांचे स्थलांतरण कसे करता येईल, याचा आढावा घेतला. याशिवाय दुष्काळाबाबत चर्चा झाली असून मदत व पंचनामा यावर सखोल चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं.


मुख्यमंत्र्यांनी कोणत्या केल्या सूचना?

अन्नधान्याचा साठा, गावांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

अडचणीच्या काळात इतर राज्यांशी संपर्क कसा करावा

लोकांना संकटात जागृत करण्याचा प्रयत्न कसा करावा

धोकादायक इमारतीतील लोकांचं स्थलांतरण कसं करता येईल

जनतेला त्रास होऊ नये, जीविताला धोका होऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या

यंत्रणा सज्ज आहेत, बैठकीतील सर्व बाबींची अंमलबजावणी होईल

संकट येऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल

लोकांना तात्काळ मदत देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे

तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन कसे करता येईल, तुकड्या वाढवण्यासाठी चर्चा झाली

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com