मुख्यमंत्री शिंदेंचा मराठा समाजाला शब्द 'आरक्षण मिळणारच'

मुख्यमंत्री शिंदेंचा मराठा समाजाला शब्द 'आरक्षण मिळणारच'

मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम येत्या 24 तारखेला संपणार आहे. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी त्यांच्या सभेमध्ये त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केली आहे.
Published by :
shweta walge
Published on

मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम येत्या 24 तारखेला संपणार आहे. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी त्यांच्या सभेमध्ये त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे', असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मराठा समाजातील लोकांनी आत्महत्या करणं ही बाब अत्यंत दु:खद असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले की, आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. मराठा समाजाला टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मी दिलेला शब्द पाळणारच.अतिशय संवदेनशील घटना घडतायत. त्यामुळे कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

जे आर्थिक घटकांमधून आरक्षण दिलं होतं ते उच्च न्यायायलयात टिकलं पण सर्वोच्च न्यायालायामध्ये ते आंदोलन टिकू शकलं नाही. पण आता क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालायाने दाखल करुन घेतली. त्यामध्ये मराठा आरक्षण प्रकरणात लक्ष घालणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटलं. मागील वेळेस ज्या गोष्टी सुप्रीम कोर्टात मांडता आल्या नाहीत त्या सर्व बाबी यावेळी मांडण्यात येतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी त्यांच्या आजच्या सभेमध्ये त्यांची पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. आतापर्यंत आपल्या 67 बांधवांनी बलिदान दिलं. पण आपल्याला आरक्षण मिळालं नाही. ज्यांनी बलिदान दिलं ते वाया जाऊ द्यायचं नाही. आजपासून एकानेही आत्महत्या करायची नाही. हे घरा घरातील मराठ्यांनी समजून घ्यावं. कारण आत्महत्या करून आरक्षण मिळणार नाही. आपण एकत्र लढू. आरक्षण मिळवूनच शांत बसूयात, असं जरांगे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com