निती आयोगाच्या बैठकीसाठी CM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, म्हणाले; "महाराष्ट्रात आपण ज्या योजना..."
CM Eknath Shinde On Niti Aayog Meeting: राजधानी दिल्लीत उद्या २७ जुलैला निती आयोगाची महत्त्वाची बैठक होणार आहे. सर्व राज्याचे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि इतर विभागाचे मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वी निती आयोगाची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निती बैठकीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.
पत्रकार परिषदते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
उद्या निती आयोगाची बैठक होणार आहे. सर्व राज्याचे मुख्यमंत्री असतात. प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि इतर संबंधीत मंत्री या बैठकीत असतात. महाराष्ट्रात आपण ज्या योजना केल्या आहेत आणि ज्या सहकार्याची आवश्यकता आहे, त्यासाठी मी या बैठकीत भूमिका घेईल, असं शिंदे म्हणाले.
निती आयोगाची बैठक उद्या १० वाजता राष्ट्रपती भवनातील कल्चरल सेंटरमध्ये होणार आहे. सर्व राज्याचे मुख्यमंत्री ९:३० वाजता राष्ट्रपती भवनातील कल्चरल सेंटरमध्ये पोहोचणार आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी ९:४५ वाजता राष्ट्रपती भवनातील कल्चरल सेंटरमध्ये पोहोचणार आहेत. या बैठकीला सकाळी १० वाजता सुरूवात होणार आहे.