दिल्ली दौऱ्यावर असणाऱ्या CM शिंदेंचं मंत्रीमंडळ विस्ताराबद्दल मोठं वक्तव्य
दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या दिल्लीत असून, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या ते भेटीगाठी घेताना दिसत आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपण दिल्ली दौऱ्यामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली असून, लवकरच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Narendra Modi) देखील भेट घेणार आहोत असं सांगितलं आहे. 2019 साली शिवसेना-भाजपने मिळून निवडणुका लढवल्या होत्या. लोकांनी आम्हाला बहुमत देखील दिलं होतं. त्याच पद्धतीनं आम्ही लोकांच्या मनासारखं सरकार स्थापन केलं. महाराष्ट्र राज्याचा विकास करण्यासाठी हे सरकार स्थापन झालं असून, शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी आम्ही केंद्रीची देखील मदत घेणार आहोत, त्यांचं व्हिजन समजून घेणार आहोत. प्रत्येक राज्याच्या विकासात केंद्र सरकारचा देखील सिंहाचा वाटा असतो. आमचं हे सरकार स्थापन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे आशीर्वाद आम्हाला लाभले असं शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. तसंच नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. नड्डा यांचेही आम्हाला सहकार्य लाभलं असं शिदेंनी सांगितलं. ज्या राज्याला केंद्राची मदत पाठिंबा मिळतो ते राज्य प्रगतीकडे जातं म्हणून या सर्व भेटीगाठी सुरु असल्याचं शिंदेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, आषाढी एकादशी झाली की, राज्यातील मंत्रीमंडळ बैठकीबद्दलची माहिती देऊ असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. शिंदेंनी या भेटीत कोणतीच चर्चा झाली असं सांगत असले तरी, मंत्रीमंडळाबद्दल चर्चा करण्यासाठीच दिल्ली दौरा असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांकडून केला जातोय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत, या टिकेवर बोलताना ते मुख्यमंत्री म्हणाले की, जनता सुज्ञ आहे. संजय राऊत यांनी केलेल्या 50 कोटी रुपयांच्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, 40 आमदार हे जनतेतून निवडूण आलेले आहे. त्यांना त्यांच्या क्षेत्रात काम करावं लागतं, ते करता येत नव्हतं, सभागृहात आम्हाला बुक्क्याचा मार सहन करावला लागत होता असं शिंदेंनी सांगितलं. हे पैशाने विकणारे आमदार नसून, स्वेच्छेने आलेले आहेत असं शिंदे म्हणाले.