मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले 'Facebook Live करत बसलो तर...'

मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले 'Facebook Live करत बसलो तर...'

शिंदे यांनी राज्यकर्त्यांनी राज्याचा विकास करायचा असतो स्वतच्या स्वर्थसाठी बंद करायचे नसतात असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published by :
shweta walge
Published on

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका विनया सावंत आणि ठाकरे गटाचे विधानसभा संघटक विष्णू सावंत शिंदे यांचा आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यकर्त्यांनी राज्याचा विकास करायचा असतो स्वतच्या स्वर्थसाठी बंद करायचे नसतात असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ज्यांनी तुमचा प्रोजेक्ट रिजेक्ट केला त्यांना जनतेने रिजेक्ट केले. स्व:ताच्या स्वर्थापुढे दूसरे काही दिसत नाहीतेव्हा असं घडते. अस म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. तसेच मी छाती ठोकपने सांगतो की, आम्ही सर्व निर्णय जनतेच्या हितासाठी घेतले. धाडसाने निर्णय घेणारे सरकार म्हणून राज्यभरातून आपल्याला पाठिंबा मिळतो.

दिड एक वर्षापूर्वी राज्यातील सर्व कामे बंद होती. राज्यकर्त्यांनी राज्याचा विकास करायचा असतो स्वतच्या स्वर्थसाठी बंद करायचे नसतात. पण आमचे सरकार आले आणि सर्व विकास कामे पुन्हा एकदा सुरू झाले.

पुढे ते म्हणाले, काल कोणीतरी विचारले होते की मुख्यमंत्री कुठे आहेत? पण मी मुख्यमंत्री जरी असलो तरी आज ही कार्यकर्ता म्हणून काम करतो. कोणीतरी म्हणत की फेसबुकवरून सरकार चालवता येतं म्हणतात पण जर नुसता Facebook Live करत बसलो तर जनतेला न्याय कसा देणार असा प्रश्न विचारत मुख्यमंत्री शिंदे यांनी हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com