एकनाथ शिंदेंनी विधानसभेच्या गच्चीवरुन उडी मारण्याची दिली होती धमकी; जाणून घ्या काय आहे किस्सा

एकनाथ शिंदेंनी विधानसभेच्या गच्चीवरुन उडी मारण्याची दिली होती धमकी; जाणून घ्या काय आहे किस्सा

ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकास योजनेचा शुभारंभ पार पडला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ठाण्यातील क्लस्टर पुनर्विकास योजनेचा शुभारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी संवाद साधला.

क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी दिलेल्या लढ्याच्या आठवणी तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितल्या. शिंदे म्हणाले की, मला ते दिवस आठवत आहेत. १९९७ला ठाण्यात साईराज इमारत कोसळली तेव्हा १८ लोक गाडले गेले. त्यांच्या किंकाळ्या मी विसरु शकत नाही. आमदारकीचा उपयोग काय? जर आम्ही उघड्या डोळ्यांनी आमच्या मतदारसंघातील लोक मरत असताना पाहत असू. असे शिंदे म्हणाले.

आम्ही शेवटच्या टोकाची भूमिका घेतली. तुम्ही निर्णय घेणार नसाल तर एकनाथ शिंदे विधानसभेच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या करेल. असे शिंदे म्हणाले. सरकार जेव्हा दाद देत नव्हते तेव्हा मी विधानसभेच्या गच्चीवरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com