Amarnath Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; 15 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Amarnath Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; 15 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

NDRF टीम आणि इतर यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या मधील अमरनाथ गुहेजवळ शुक्रवारी ढगफुटी (Amarnath Cloudburst) होऊन 15 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ढगफुटी झाल्याची नोंद झाली आहे. "सायंकाळी 5.30 च्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू असताना अचानक पाण्याचा मोठा प्रवाह आला. अमरनाथ गुहेच्या वरच्या भागात ढगफुटी झाली. एजन्सींना सतर्क करण्यात आलं आहे. लोकांना 10-15 मिनिटांत बाहेर काढण्यात आलं अशी माहिती आयटीबीपीचे पीआरओ विवेक कुमार पांडे यांनी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या घटनेची दखल घेतली असून, "बाबा अमरनाथजींच्या गुहेजवळील ढगफुटीमुळे आलेल्या महापुराबाबत मी एलजी मनोज सिन्हा यांच्याशी बोलून परिस्थितीची माहिती घेतली. एनडीआरएफ, सीआरपीएफ, बीएसएफ आणि स्थानिक प्रशासन बचाव कार्य करत आहेत. लोकांचे जीव वाचवणे ही आमची प्राथमिकता आहे. मी सर्व भक्तांसाठी प्रार्थना करतोय" असं अमित शहा म्हणाले आहेत.

यात्रा मार्गावरील सामुदायिक स्वयंपाकघर आणि तंबूंचंही नुकसान झालं आहे. जखमींना उपचारासाठी विमानाने हलवण्यात येत आहे. राष्ट्रीय आणि राज्याच्या NDRF टीम आणि इतर यंत्रणांकडून बचाव कार्य सुरू आहे. अनेक तंबू वाहून गेले असून, जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं आहे. सैन्याचे जवान सध्या इतर बचाव कार्यासाठी आलेल्या पथकांसोबत मिळून काम करत आहेत. काही जणांना नदीत वाहून जाण्यापासून वाचवण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असून, पाऊस सुरूच आहे. परिसर जलमय झाल्याने अमरनाथ यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. जर हवामान सामान्य राहिलं आणि तात्पुरती व्यवस्था केली गेली, तर उद्या यात्रा पुन्हा सुरू केली जाऊ शकते असं विवेक कुमार पांडे यांनी सांगितलं आहे.

Amarnath Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी; 15 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
लंडनमधून भारतात येणारं विमान अचानक रद्द; 300 भारतीय अडकले

परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. खराब हवामानामुळे या आठवड्याच्या सुरुवातीला अमरनाथ यात्रा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती. 2 वर्षांच्या कोविडकाळानंतर या वर्षी 30 जून रोजी यात्रेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून 72,000 हून अधिक यात्रेकरूंनी मंदिरात प्रार्थना केली आहे. 11 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर यात्रेची सांगता होणार आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com