शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणात सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट
महाराष्ट्र शिखर बॅक घोटाळ्याप्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवार सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने क्लिन चिट दिली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांनी जय अॅग्रोटेकच्या संचालक पदाचा २ वर्षापूर्वी म्हणजेच २०१० रोजी राजीनामा दिला. त्यानंतर ईडीने अजित पवार यांच्यावर जरंडेश्वर कारखान्या संदर्भात मनीलॉड्रींगचे जे आरोप केले. या व्यवहारात जय अॅग्रोने जरंदेश्वर कारखान्याला कर्ज स्वरुपात २०.२५ कोटी रुपये दिले. २०१० मध्ये गुरू कमोडिटीने जरंडेश्वर को-ऑप शुगर मिलची दशके लिलावाद्वारे ६५.७५ कोटींमध्ये खरेदी केली.
जरंडेश्वर साखर कारखान्याला गुरु कमोडिटीने गिरणी भाडेतत्त्वावर दिली ज्यात अजित पवारांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे संचालक होते.जरंडेश्वर साखर कारखान्याने गुरु कमोडिटीजला ६५.५३ कोटी भाडे दिले.
गिरणीच्या लिलावादरम्यान कोणतेही गुन्हेगारी कृत्य झालेले नाही म्हणूनच आर्थिक गुन्हे शाखेने सुनेत्रा पवार यांना क्लिन चिट दिल्याची माहिती समोर आली आहे.