आळंदीत पोलिसांची आणि वारकऱ्यांची बाचाबाची; पोलिसांनी समोर आणला आणखी एक व्हिडिओ
रविवारी संत ज्ञानेश्वर महाराज्यांच्या पालखी प्रस्थानच्यावेळी या पालखी सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट लागल्याचे समोर आले. सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. त्यानंतर वारकरी आणि पोलिसांमधील झटापटाची व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल झाला. या बाचाबाचीनंतर विरोधकांनी यावरून सरकार आणि पोलिसांवर एकच टीका करण्याची सुरूवात केली होती. त्यानंतर आता आळंदी घटने प्रकरणी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये नियम डावलून वारकरी तरुण पोलिसांना तुडवत मंदिराच्या दिशेने धावत असल्याचं पाहायला मिळत आहे.
नेमकं काय आहे त्या व्हिडिओत?
रविवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्तावनावेळी मंदिराच्या बाहेर पोलीस आणि तरुण वारकरी समोरासमोर आले होते त्यांच्यात झटापट झाली होती. त्यानंतर आता पोलिसांनी आपली बाजू मांडणारा व्हिडिओ समोर आणला. यामध्ये अस दिसते की, मंदिराच्या समोर काही तरुण मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. यामध्ये वारकरी एका पोलीस अधिकाऱ्याला तुडवत जाताना दिसत आहे. मात्र, आता हा व्हिडिओ समोर आल्याने यामुळे या सर्व वादाला आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.