अयोध्येत उभे राहणार 'महाराष्ट्र भवन'
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुंबईत भेट

अयोध्येत उभे राहणार 'महाराष्ट्र भवन' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मुंबईत भेट

अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवल्याने तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रशांत गोडसे, मुंबई

अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवल्याने तिथे महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही उपस्थित होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी राजभवन येथे स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येमध्ये 'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली. या मागणीला योगीजीनी तत्वतः मंजुरी दिली. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना आपण लवकरच प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री राम नाईक तसेच खासदार रवी किशन हेदेखील उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com