शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत ‘या’ दोन नेत्यांना माहिती होती; छगन भुजबळ यांनी सरळ नावंच सांगितली...
राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे राज्याच्या राजकारणासह राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रचंड गदारोळ निर्माण झाला होता. मात्र, कार्यकर्त्यांच्या आक्रोशामुळे, आंदोलनामुळे राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहणार असल्याची घोषणा केली.
याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका माध्यमांशी ते बोलत होते. छगन भुजबळ म्हणाले की, पवारसाहेबांनी कमिटी गठीत केली. पण मी आधीच सांगितलं की कमिटी मला मान्य नाही. कुटुंबातील नेत्यांना या निर्णयाची माहिती होती. लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम अर्धवट सोडून मी कोर्टात गेलो. तिथे मला कळालं की पवारसाहेबांनी राजीनामा दिला आहे आणि मला धक्काच बसला. शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घडामोडीमध्ये मी नव्हतो. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना या राजीनाम्याची कल्पना होती. असे भुजबळ म्हणाले.