शरद पवारांच्या त्या आरोपांना छगन भुजबळांचं उत्तर; म्हणाले 'कोर्टात जाताहेत ना…'

शरद पवारांच्या त्या आरोपांना छगन भुजबळांचं उत्तर; म्हणाले 'कोर्टात जाताहेत ना…'

आज बारामतीत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाबाबत आलेल्या निर्णयावर भाष्य केलं. हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचं शरद पवार म्हणाले.
Published by :
shweta walge
Published on

आज बारामतीत बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाबाबत आलेल्या निर्णयावर भाष्य केलं. हा निर्णय आपल्याला मान्य नसल्याचं शरद पवार म्हणाले. त्यांच्या या टीकेला अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी उत्तर दिलं आहे. नाशिकमध्ये बोलताना भुजबळांनी पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा कायद्याला धरून आहे की नाही, त्याचासाठी ते सुप्रीम कोर्टात जाताहेत ना… सुप्रीम कोर्टात न्यायाधिश बसलेले आहेत. कायदेपंडित बसलेले आहेत. ते ठरवतील. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय उत्तर द्यायला पाहिजे, काय निर्णय घ्यायला पाहिजे ते सांगतील ना… सुप्रीम कोर्टात जातातच आहे ना, तर जा…, असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

ओबीसी निधीवरून शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यावरही छगन भुजबळ बोलले आहेत. मला जर त्यांनी डिटेल्स दिली. तपशील दिला तर विचारता येईल. मला तर तसे काहीही माहीत नाही. त्यांच्याकडे जर एखादी फाईल दिली तर लगेचच ती मार्गी लागते, ते ठेवत नाही, असं भुजबळ म्हणाले.

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. त्यावर भुजबळांनी भाष्य केलंय. त्याची संस्कृती आहे ती… मोठा नेता आहे तो.. तिथे झोपणार अन् तिथून सांगणार हे झालं पाहिजे अन् ते झाले पाहिजे. काय चाललंय काय, दुकाने बंद करा..गाड्या जाळा… हे काय टोळ्यांचे राज्य आहे का? बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेले हे लोकशाहीचे महाराष्ट्र राज्य आहे. ते मंत्र्यांनी अन् पोलिसांनी दाखवून दिले पाहिजे. कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. कायदा जर कुणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याचेवर कडक कारवाई केली पाहिजे. तो लहान नेता असो वा मोठा नेता असून किंवा कोणत्याही समाजाचा नेता असो. काहीही मुद्दा येत नाही, असं भुजबळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com