महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय - छगन भुजबळ
Admin

महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय - छगन भुजबळ

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीच्या कार्यक्रमासाठी सदनातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले. यावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, आमचा सावरकरांच्या कार्यक्रमास विरोध नाही, पण महापुरुषांचे पुतळे हटवून तुम्ही दाखविलेल्या हीन दर्जाच्या मानसिकतेचं नवल वाटतंय. या लोकांच्या बुद्धीची कीव येते. सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पुतळे हटविण्याचे काही गरज नव्हती. हे असं घडायला नको. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी लक्ष घालून या घटनेची चौकशी करावी. महाराष्ट्र सरकारने याबाबत चौकशी केली पाहिजे. असे भुजबळ म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com