छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळत आहे. छगन भुजबळ सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेणार आहेत. भुजबळ यांनी काल बारामतीमध्ये झालेल्या सभेत बोलताना नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली होती. या भेटीचे कारण अजून गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची पहिल्यांदा भेट होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महायुतीचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. कुठल्याही प्रकारचा निर्णय भुजबळ साहेब असा घेणार नाहीत जो महायुतीला डॅमेज करेल, भुजबळ साहेब उलट महायुती कशी एकत्र राहील, ती कशी एकजूट राहील याचा प्रयत्न नेहमीच करतात. मला असं वाटतं शरद पवार साहेबांना भेटणं यात काही आम्ही ही अनेकवेळा भेटलोय शरद पवार साहेबांना. त्यामुळे काही असे विषय असतात की, वरिष्ठांचे मार्गदर्शन राज्याकरता घ्यावं लागते. त्यामुळे या भेटीमध्ये काही राजकीय समजू नये.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, छगन भुजबळजी असा कुठलाही निर्णय घेणार नाहीत. ज्यामध्ये महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेचं जे रक्षण महायुती करते आहे त्या महायुतीला कुठलही त्या ठिकाणी कमी जास्त होईल. महायुती पुढच्या काळात टीकेल आणि पुन्हा या महाराष्ट्रात सरकार येईल. या करता भुजबळ साहेब महत्वाचा दुवा म्हणून काम करतील. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.