मोठी बातमी: न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली

मोठी बातमी: न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली

न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढण्यात आली आहे. न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

देशात ऐतिहासिक घटना घडली आहे. तुम्ही अनेकदा चित्रपटात न्याय देवता पाहिली असेल. न्याय देवतेच्या एका हातात तराजू आणि दुसऱ्या हातात तलवार अशी मूर्ती पाहायला मिळते. मात्र, आता न्याय देवतेच्या मूर्तीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे.

न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढण्यात आली आहे. न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वाचनालयातही असाच पुतळा बसवण्यात आला आहे. आधी न्यायदेवतेची मूर्ती असायची त्याच दोन्ही डोळ्यांवर पट्टी बांधली होती. तसेच, एका हातात तराजू तर दुसऱ्या हातात तलवार होती. जी शिक्षेचे प्रतीक आहे.

CJI चंद्रचूड यांचा असा विश्वास होता की इंग्रजांचा वारसा सोडून आता पुढे गेले पाहिजे. कायदा कधीच आंधळा नसतो. तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते. देवीच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com