भारताने रचला इतिहास! चांद्रयान-3चे लॅंडिंग यशस्वी

भारताने रचला इतिहास! चांद्रयान-3चे लॅंडिंग यशस्वी

भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे.
Published on

नवी दिल्ली : भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. आज संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयानने दक्षिण ध्रुवाला स्पर्श केला आहे. यासोबतच भारताने इतिहास रचलेला आहे. यानिमित्त अवघ्या देशाकडून इसरोवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडींग करणारा भारत हा जगातील चौथा देश बनणार आहे. तर दक्षिण धुव्रवार उतरणारा पहिला देश ठरला आहे.

विक्रम लँडरवरील चार पेलोड काय करतील?

1. रंभा (RAMBHA) : हे चंद्राच्या पृष्ठभागावर सूर्यापासून येणार्‍या प्लाझ्मा कणांची घनता, प्रमाण आणि बदल तपासेल.

2. . चास्टे (ChaSTE) : हे चंद्राच्या पृष्ठभागाची उष्णता म्हणजेच तापमान तपासेल.

3. इल्सा (ILSA) : हे लँडिंग साइटच्या आसपासच्या भूकंपीय क्रियाकलापांची तपासणी करेल.

4. लेजर रेट्रोरिफ्लेक्टर एरे (LRA) : तो चंद्राची गतिशीलता समजून घेण्याचा प्रयत्न करेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com