Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleTeam Lokshahi

शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार? बावनकुळेंनी दिलं आश्वासन

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने व त्यानंतर आता सुरू असलेल्या परतीच्या पावसाने राज्यात जवळपास सगळ्याच जिल्ह्यांत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Published by :
Vikrant Shinde
Published on

सुरज दहाट | अमरावती: राज्यात झालेल्या मुसळधार पावसाने व त्यानंतर आता सुरू असलेल्या परतीच्या पावसाने राज्यात जवळपास सगळ्याच जिल्ह्यांत शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या सर्व परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना त्वरीत maमिळावं अशी मागणी केली जात आहे. या विषयावर सत्तेत असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule
राज ठाकरे शिवसेनेच्या पाठीशी? धनुष्यबाण गोठवल्याच्या निर्णयानंतर राज ठाकरेंचं आवाहन...

अतिवृष्टी आणि सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, शिंदे भाजप सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. नुकतंच चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यावर असताना त्यांनी दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिल आहे यासाठी शिंदे आणि भाजप सरकार प्रयत्नात असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले बावनकुळे?

"पंचनामा करण्यासाठी वेळ लागतो. तरीही, शिंदे फडणवीस सरकारने अतिशय गतीने पंचनामे केले आहेत. लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. NDRF च्या नियमांपेक्षा दुप्पट मदत आम्ही दिली आहे."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com