Sushma Andhare On BJP
BJP Spokesperson New ListLokshahi

भाजपची प्रवक्त्यांची यादी वादाच्या भोवऱ्यात! उज्ज्वल निकम यांच्या नावाचा समावेश, सुषमा अंधारेंनी घेतला आक्षेप, म्हणाल्या...

भारतीय जनता पक्षाने नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत पत्रक जाहीर करून माहिती दिलीय.
Published by :
Naresh Shende
Published on

BJP Spokesperson New List : भारतीय जनता पक्षाने नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत पत्रक जाहीर करून माहिती दिलीय. परंतु, भाजपच्या प्रवक्त्यांच्या यादीत भाजपकडून लोकसभा निवडणूक लढलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लोकशाहीशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विशेष सरकारी वकील म्हणून रुजू झालेले उज्ज्वल निकम यांचं नाव भाजपच्या प्रवक्त्यांच्या यादीत आहे, यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, सामाजिक स्वास्थ बिघडवण्यासाठी भाजपचे प्रवक्ते बोलत असतात. आतापर्यंत ही जबाबदारी नितेश राणे, निलेश राणे, नवनीत राणा, चित्रा वाघ अशा अनेक लोकांना ती जबाबदारी दिली होती. हे लोक रोज कर्णकर्कश ओरडायचे. आक्रास्थाळेपणा आणि आकांडतांडव करुन सामाजित स्वास्थ बिघडंवायचे. पण कदाचित भाजपच्या लक्षात आलं असावं की, कर्णकर्कश बोलण्याचा फार काही परिणाम होत नाही.

या चिथावणीखोर लोकांच्या यादीत उज्ज्वल निकम यांचं नाव येणं आक्षेपार्ह आहे. भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढलेला माणसाची पुन्हा एकदा सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते. आता सरकारी वकील म्हणून नियुक्ती झालेला माणूस भाजपचा अधिकृत प्रवक्ता म्हणून बोलणारा असेल, तर हे धक्कादायक आहे. न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील हे पहिलं उदाहरण आहे. एखादी व्यक्ती सरकारी पदावर कार्यरत आहे, असं असतानाही ते भाजपचे प्रवक्तेपद सांभाळणार आहेत, हे वाईट आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com