Chandrapur temperature
Chandrapur temperature Team Lokshahi

Chandrapur Heatwave: चंद्रपूरात जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद

बुधवारी सर्वाधिक उष्णेतेच्या यादीत जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, चंद्रपूर या शहरांची नावे समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

चंद्रपूरातील (Chandrapur) तापमानाची चर्चा आता विश्वात होत आहे. बुधवारी सर्वाधिक उष्णेतेच्या यादीत शहरांची नावे समोर आली आहे. यामध्ये पहिले म्हणजे जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे जगातील 45. 3हे सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. आणि दुसरे म्हणजे त्याच्या खालोखाल चंद्रपूर हे जगातील 45.2 अंश ऐवढे तापमान नोंदवले आहे.

Chandrapur temperature
विदर्भ तापला! तापमान सध्या चाळीस अंशांच्या वर

उन्हाळ्यामध्ये चंद्रपूरमधील तापमानाचा (temperature) दर हा चर्चेचा विषय असतो. यावेळी वाढत्या तापमानामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र चंद्रपूरमधील प्रशासन हे उपयोजना करण्यात अपयशी होत आहेत. तसेच चंद्रपूरमध्ये 2007 मध्ये तापमानाचा अंश 49 डिग्रीवर गेला होता. तर मागील वर्षी तापमान हा 48 अंश इतका होता. तर आज गुरूवारी तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. आज तापमान हे 45.4 वर गेले आहे.

Chandrapur temperature
पंढरपुरात ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळेंना घेरलं

वाढत्या तापमानावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांनी सांगितले की, वाढते तापमान हे प्रदुषाणाची देण आसल्याचे म्हटले. चंद्रपूरमध्ये रात्री उष्णतेचे तापमान हे अधिक असते. उन्हाळ्यामध्ये (Summer) या वाढत्या तापमानामुळे चंद्रपूरमध्ये आग ओकू लागते. तसेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तापमानाचा पारा चढला होता. मात्र आता एप्रिल महिन्यामध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च आणि एप्रिल महिण्यातील चंद्रपूरमधील तापमान हे जागतिक रेकॉर्ड (record) केले. आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com