Chandrapur Rain: चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वीज कोसळली; सहा ठार, नऊ जखमी

Chandrapur Rain: चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा वीज कोसळली; सहा ठार, नऊ जखमी

जिल्ह्यात बुधवारी दुपारच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अनिल ठाकरे, चंद्रपूर

जिल्ह्यात बुधवारी दुपारच्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. नागभीड, ब्रम्हपुरी, पोंभूर्णा, कोरपना व गोंडपिंपरी तालुक्यात वीज कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर नऊ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये गीता पुरुषोत्तम ढोंगे (४५), गोविंदा लिंगू टेकाम (५६), अर्चना मोहण मडावी (२७), पुरुषोत्तम अशोक परचाके (२५), कल्पना प्रकाश झोडे (४०) आणि अंजना रूपचंद पुस्तोडे (५०) यांचा समावेश आहे.

ब्रम्हपुरी जवळील मौजा बेटाळा येथील गीता पुरुषोत्तम ढोंगे (४५) या आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास शेतावर काम करून घरी परत येत होत्या. वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा गावात शेतात काम करताना वीज कोसळल्याने अर्चना मोहन मडावी (२७) या महिलेचा मृत्यू झाला. खुशाल विनोद ठाकरे (३०), रेखा अरविंद सोनटक्के (४५), सुनंदा नरेंद्र इंगोले (४६), राधिका राहुल भंडारे (२०), वर्षा बिजा सोयाम (४०), रेखा ढेकलु कुळमेथे (४५) हे जखमी झाले.

जखमींमधील खुशाल ठाकरे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. नागभीड तालुक्यातील नांदेड येथे रोवणीचे काम सुरू असताना वीज कोसळली. यात सोफिया शेख (१७), महेशा शेख (१६) या दोघी गंभीर जखमी झाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com