BJP President Rule in Maharashtra
BJP President Rule in MaharashtraTeam Lokshahi

"राज्यातील कायदा सुव्यस्था बिघडली"; भाजप राजभवनावर जाऊन राष्ट्रपती राजवटीची मागणी करणार

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोहित कंबोज यांच्यावरील हल्ला आणि राणा दाम्पत्याच्या मुद्दयावरून आक्रमक.
Published by :
Sudhir Kakde
Published on

मुंबई : राज्यात सध्या हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) आणि भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मोठा वाद सुरु आहे. त्यातच राणा दाम्पत्याने मातोश्रीवर (Matoshree) जाण्याचा दिलेला इशारा आणि काल रात्री भाजपच्या मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावर झालेला हल्ला, यामुळे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघालं आहे. त्यामुळे आता भाजपने (BJP) आक्रमक पवित्रा घेतला असून, यावरुन राज्यातील कायदा व सुव्यस्था बिघडली असल्याचं भाजपने म्हटलं आहे. याच विषयावर आज भाजप पत्रकार परिषद घेणार असून, दुपारी भाजपचे आमदार राजभवनावर देखील जाणार असल्याची शक्यता आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी केल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. (BJP Demands President Rule in Maharashtra)

BJP President Rule in Maharashtra
"नमाज पठण करण्यासाठी शिवाजी पार्क मैदान द्या, अन्यथा..."

मुंबईतील कलानगर परिसरात काल रात्री मोहित कंबोज यांच्या वाहनावर हल्ला झाला. या हल्ल्यात मोहित कंबोज यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता भाजपने या मुद्दयावरून सरकारवर टीका करत कायदा व सुव्यस्था बिघडल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे नवणीत राणा आणि रवी राणा यांच्या घराबाहेर झालेली गर्दी देखील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता भाजपचं शिष्टमंडळ आज या मुद्दयावरून राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. एकूणच या मुद्यावंरुन भाजप राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणार असल्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com