"मी जगातील सर्वांत मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष..."; अखेर चंद्रकांत पाटलांनी मागितली माफी
पुणे | अमोल धर्माधिकारी : सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप (BJP) प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील अडचणीत आले आहेत. राजकारण येत नसेल तर घरी जाऊन भांडे घासा असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या स्तरांतून चंद्रकांत पाटलांचा निषेध करण्यात आला होता. सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनीही पहिल्यांदाच राजकीय विषयावर बोलत निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर आता चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) अखेर माफी मागितली आहे.
सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर माध्यमांनी सवाल केले असता चंद्रकांत पाटील यांनी सदानंद सुळे यांनाच उलट सल्ला दिला होता. त्यानंतर महिला आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती. अखेर आता चंद्रकांत पाटलांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून माफी मागितली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, "आयुष्याची 45 वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap. सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रदिवन प्रवन करणान्या जगातील सर्वांत मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार म देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिना खासदार आहेत. मला सुप्रियाताईबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात बुःख नाही." अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली आहे.