चंद्रकात खैरे घेणार उध्दव ठाकरे यांची भेट

चंद्रकात खैरे घेणार उध्दव ठाकरे यांची भेट

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. छत्रपती संभाजीनगरातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला तर मंत्री संदीपान भुमरे यांचा विजय झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. छत्रपती संभाजीनगरातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला तर मंत्री संदीपान भुमरे यांचा विजय झाला. याच पार्श्वभूमीवर चंद्रकात खैरे आज उध्दव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन पक्षात असताना मदत न करणाऱ्या नेत्यांच्या तक्रारी करणार असल्याची माहिती मिळत आहे. निवडणुकीत एकटा पडलो असता पक्षातील नेत्यांनी मदत न केल्याचा खैरेंचा आरोप आहे. त्यामुळे आता चंद्रकात खैरे आणि उध्दव ठाकरे यांच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com