Earthquake: सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण परिसराला जाणवले भूकंपाचे धक्के
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम असून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी नोंदवली गेली. सांगली जिल्ह्याला भूकंपाचा धक्का जाणवला आहे. चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्के जाणवत आहेत. भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. धरण परिसराला धोका नसल्याची माहिती आहे.
शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंप झाला. सांगलीत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.
गेल्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हे धरण 82 टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मात्र, त्याचवेळी भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.