Megablock : मध्य रेल्वेचा 27 तासांचा मेगाब्लॉक; कोणत्या गाड्या रद्द? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्वाची बातमी उद्यापासून दोन दिवस मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. या कामानिमित्त मध्य रेल्वे मुख्य आणि हार्बर मार्गावरील 1 हजार 96 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी-मशीद बंदर रेल्वे स्थानकादरम्यान धोकादायक कर्नाक उड्डाणपुलाचं पाडकाम सुरु करण्यात येणार आहे. यानिमित्त हा 27 तासांचा मेगाब्लॉक घेतला आहे.
या मार्गावरील लोकल फेऱ्या ठप्प
कर्नाक पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर 19 नोव्हेंबर म्हणजे शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते 21 नोव्हेंबर म्हणजे सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये 36 मेल एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळादरम्यानची उपनगरीय लोकल सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे.
मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकलसेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांपर्यंत चालवण्यात येतील. त्याठिकाणावरुन परतीचा प्रवास सुरु होईल. या कालावधीमध्ये भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडील लोकल गाड्यांची संख्या मात्र कमी असेल.
मेगाब्लॉकमुळे खालील ट्रेन झाल्या रद्द
19 नोव्हेंबर 2022 रोजी या ट्रेन रद्द –
– 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्स्प्रेस
– 12112 अमरावती – मुंबई एक्स्प्रेस
– 17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्स्प्रेस, निजामाबाद मार्गे
– 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
– 12187 जबलपूर – मुंबई गरीबरथ एक्स्प्रेस
20 नोव्हेंबर 2022 रोजी या ट्रेन रद्द –
– 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्स्प्रेस
– 12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्स्प्रेस
– 12188 मुंबई – जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस
– 02101 मुंबई – मनमाड विशेष
– 12109 मुंबई – मनमाड पंचवटी एक्स्प्रेस
– 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस
– 12111 मुंबई – अमरावती एक्स्प्रेस
– 12110 मनमाड – मुंबई पंचवटी एक्स्प्रेस
-12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे
– 02102 मनमाड – मुंबई स्पेशल
– 12072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
– 17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे
– 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस
21 नोव्हेंबर 2022 रोजी या ट्रेन रद्द –
-17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्स्प्रेस
डाउन ट्रेन्सचे शॉर्ट ओरीजनेशन –
19 नोव्हेंबर 2022 रोजी दादर येथून सुटणाऱ्या ट्रेन –
– 11057 मुंबई – अमृतसर एक्स्प्रेस