ताज्या बातम्या
LPG Subsidy : केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा; एलपीजी सिलेंडरवर सबसिडी केली जाहीर
केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.
केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. एलपीजी सिलेंडरवर सबसिडी केली जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे 2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 7,680 कोटी रुपये खर्च होणार आहे.
उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारने प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. हे अनुदान 14.2 किलोच्या 12 एलपीजी सिलेंडरवर देण्यात येईल. नव्या आर्थिक वर्षात ही सबसिडी लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति एलपीजी सिलिंडर 200 रुपये सबसिडी एका वर्षासाठी वाढवली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे. असे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं.