OTT Apps Banned: मोठी बातमी! केंद्र सरकारने १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर घातली बंदी

OTT Apps Banned: मोठी बातमी! केंद्र सरकारने १८ ओटीटी प्लॅटफॉर्मवर घातली बंदी

केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सततच्या अश्लिल कॉन्टेंटमुळे आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेत 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

केंद्र सरकारने ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सततच्या अश्लिल कॉन्टेन्टमुळे आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेत 18 ओटीटी प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे. अश्लील साहित्याचा प्रसार करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. अश्लील साहित्याचा प्रसार करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याचा इशारा याआधीच केंद्र सरकारने दिला होता.

अश्लील कॉन्टेन्ट प्रसार करणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कडक कारवाई करण्याचा इशारा यापुर्वी देखील केंद्र सरकारकडून देण्यात आला होता. आता याचा निर्णय घेण्यात आला असून १९ वेबसाइट्स, १० ॲप्स आणि ५७ सोशल मीडिया हँडलवर IT कायदा, भारतीय दंड संहिता आणि इतर संबंधित कायद्यासह अनेक कायद्यांचे उल्लंघन केल्याच्या आधारे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, बंदी घालण्यात आलेले १८ ओटीटी प्लॅटफॉर्मची नावे पुढीलप्रमाणे:

ड्रिम्स फिल्म्स (Dreams Films)

वुव्ही (Voovi)

येस्समा (Yessma)

अनकट अड्डा (Uncut Adda)

निऑन एक्स व्हिआयपी (Neon X VIP)

रॅबिट (Rabbit)

मूडएक्स (Moodx)

फुगी (Fugi)

ट्री फ्लिक्स (Tri Flicks)

एक्स प्राइम (X Prime)

बेशरम्स (Besharams)

हंटर्स (Hunters)

एक्स्ट्रामुड (Xtramood)

मोजफ्लिक्स (Mojflix)

चिकुफ्लिक्स (Chikooflix)

न्यूफ्लिक्स (Nueflix)

हॉट शॉट्स व्हिआयपी (Hot Shots VIP)

प्राइम प्ले (Prime Play)

या प्लॅटफॉर्मवर एका कॉन्टेन्ट मोठा भाग हा अश्लील, आक्षेपार्ह आणि महिलांसाठी अपमानास्पद असल्याचे आढळून आले. माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67 आणि 67ए, आयपीसीचे कलम 292 चे उल्लंघन असल्याचे दिसून आले. तसेच, यात फेसबुकवरील १२, इन्स्टाग्रामवरील १७, X वरील १६ अकाऊंट आणि युट्यूब वरील १२ चॅनेलवर देखील कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे लहान मुलांच्या हातात आता मोबाईल देताना पालकांना शाश्वती असेल ती त्यांची मुले कोणताही आक्षेपार्ह कॉन्टेन्ट पाहात नाही आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com