केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; गुजरात निवडणूकांच्या तारख्या जाहीर होणार का?
गुजरात विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी १२ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी 22 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत 108 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. AAP हा एकमेव राजकीय पक्ष आहे ज्याने गुजरात निवडणुकीसाठी 100 हून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबरला हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्याचवेळी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र, त्यावेळी आयोगानं या निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नाहीत.गुजरात विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपत आहे. १८२ सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत १११ आमदार भाजपाचे आहेत. याशिवाय काँग्रेसचे ६२ आमदार आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसनं आतापासूनच कंबर कसली आहे.
तसेच, यंदा गुजरातची निवडणूक लढवणार असल्याचं आम आदमी पक्षानं जाहीर केल्यामुळं यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने (आप) मंगळवारी 22 उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. पक्षाने आतापर्यंत 108 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.