केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद; अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. आज दुपारी 3.30वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जाहीर होणार आहे
आजच निवडणुकांची घोषणा होणार असून आजपासून आचारसंहिता लागणार आहे. निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार असून निवडणुकांच्या तारखांच्या घोषणा होणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाची अशी निवडणूक आहे. आम्ही आतुरतेनं वाट पाहत होतो की केव्हा आचारसंहिता लागणार आणि केव्हा निवडणुका होणार. ऑक्टोबरमध्ये निवडणुका व्हायला हव्या होत्या.
मला वाटतं सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने अजून निवडणुका पुढे ढकलल्या. पण ठिक आहे. एकदा आज त्याची घोषणा होईल. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकोप्याने या निवडणुका लढणार आहोत. असे अनिल देशमुख म्हणाले.