महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार; आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार; आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. आज दुपारी 3.30वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका जाहीर होणार आहे

आजच निवडणुकांची घोषणा होणार असून आजपासून आचारसंहिता लागणार आहे. निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करणार असून निवडणुकांच्या तारखांच्या घोषणा होणार आहेत.

28 नोव्हेंबर रोजी विधेनसभेचा कार्यकाळ संपणार आहे. महाराष्ट्रात 288 जागांसाठी निवडणुका होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com