CBSE Class 10 & 12 Exams : दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21मार्च आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान
सीबीएसईच्या साली जवळपास 35 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावीची परीक्षा दिली होती. कोरोना काळात गेल्या वर्षी सीबीएसईनं परीक्षा दोन टर्ममध्ये घेतल्या होत्या. यंदा मात्र तसं होणार नसून परीक्षा एकाच टर्ममध्ये घेतली जाणार आहे.
सीबीएसईच्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून cbse.gov.in या संकेतस्थळावर वेळापत्रक देखील देण्यात आलंय. बोर्डाने काल परिपत्रक जाहीर करत ही माहिती दिली.
प्रॅक्टिकल परीक्षेला विद्यार्थी गैरहजर राहिल्यास निकालात विद्यार्थी गैरहजर असल्याचं नोंदवण्यात यावं आणि एखाद्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिकल परीक्षा इतर कोणत्याही तारखेला घेतली जाणार असेल तर त्याची 'अनुपस्थित' ऐवजी 'रीशेड्यूल' अशी नोंद केली जावी, असंही बोर्डानं म्हटलं आहे. दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या 2 जानेवारी ते 14 जानेवारी 2023 दरम्यान इयत्ता दहावी आणि बारावीसाठी प्रॅक्टिकल परीक्षा घेणार आहे.
असे डाऊनलोड करा वेळापत्रक
वेळापत्रक डाऊनलोड करण्यासाठी cbse.gov.in य संकेतस्थळाला भेट द्यावी
दहावी, बारावी परीक्षा शेड्युल 2023 वर क्लिक करावे
त्यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या दोन वेगवेगळ्या पीडीएफ तुम्हाला स्क्रिनवर दिसतील
विद्यार्थ्यांना दहावी, बारावी परीक्षेची डेटशीट डाऊनलोड करावी