आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला सीबीआयकडून अटक
आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांच्या पतीला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. 2009 ते 2011 दरम्यान आयसीआयसीआय बँकेनं व्हिडिओकॉन समूहाला सुमारे 1875 कोटींचं कर्ज दिलं होतं. मात्र या आर्थिक व्यवहारांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप कोचर यांच्यावर करण्यात आला.
या प्रकरणामुळे चंदा कोचर यांना बँकेचं सीईओपद सोडावं लागलं होतं. बँकेच्यावतीने देण्यात आलेल्या नियमबाह्य कर्जामुळे बँकेला आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात सीबीआयनं 22 जानेवारी 2019 रोजी गुन्हा नोंदविला आहे.
२६ ऑगस्ट २००९ रोजी व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला ३०० कोटी रुपये आणि ३१ ऑक्टोबर २०११ रोजी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला ७५० कोटी रुपयांचे कर्ज वितरण बॅकेने चंदा कोचर यांच्या समितीअंतर्गत मंजूर केले होते. या आरोपांनंतर चंदा कोचर यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि एमडी पदाचा राजीनामा दिला.