Wadhwan brothers : वाधवान बंधूंच्या महाबळेश्वरमधील बंगल्यावर सीबीआयची कारवाई पूर्ण; अधिक किमतीच्या वस्तू सील
येस बँक (Yes Bank) घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने (CBI)एप्रिल 2020 मध्ये वाधवान बंधूंना (Wadhwan brothers) महाबळेश्वर (Mahabaleshwar) मधून अटक केली होती. तेव्हापासून कपिल आणि धीरज वाधवान बंधू तुरुंगामध्ये आहेत. शुक्रवारी सकाळी सीबीआयचे (CBI) पथक महाबळेश्वर येथील वाधवान यांच्या बंगल्यात दाखल झाले. सलग दोन दिवस पथकातील अधिकाऱ्यांनी बंगल्याची तपासणी केली.
या बंगल्यात कोट्यावधी रुपये किमतीची ख्यातनाम चित्रकारांनी केलेली पेंटिंग्स आणि दुर्मिळ मौल्यवान शोभेच्या वस्तू आढळून आल्या. ही सर्व पेंटिंग्स आणि वस्तू सिबीआयच्या अधिकाऱ्याने जप्त करून ताब्यात घेतले आहेत.
गेले दोन दिवस ही पेंटिंग आणि वस्तू सील करण्याचे काम सुरू होते. शनिवारी सायंकाळी कारवाई पूर्ण झाल्यावर अधिकारी सर्व पेंटिंग्स आणि मौल्यवान वस्तू जप्त करून मुंबई आणण्यात आल्या. या कारवाईत 30 ते 40 कोटींच्या वस्तू जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.
काही महिन्यांपूर्वी एबीजी शिपयार्ड कंपनीत 22 हजार 842 कोटींचा घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर आता युनियन बँक ऑफ इंडियासह इतर बँकांची जवळपास 34,615 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. सीबीआयने याप्रकरणी मुंबईत 12 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. याप्रकरणी दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि तात्कालीन मुख्य व्यवस्थापकीय संचालक धीरज वाधवान यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला.