संजय राऊत धमकी प्रकरणी लॅारेन्स बिश्नोईवर गुन्हा दाखल

संजय राऊत धमकी प्रकरणी लॅारेन्स बिश्नोईवर गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी चा मॅसेज खासदार संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला असल्याची माहिती मिळत आहे. हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू असा हा मॅसेज आहे. दिल्लीत आल्यावर AK 47 ने उडवून टाकू. मुसेवाला टाईपमध्ये मारु. लॅारेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स तयारी करके रखना. अश्लील शिवीगाळ करत हा मॅसेज करण्यात आलांय.

याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातून संजय राऊत यांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून राहुल तळेकर या तरुणाला पुण्यातील गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

आता या धमकी प्रकरणी लॅारेन्स बिश्नोईवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांजूरमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी माहिती दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com