यूजीसी नेट परीक्षा रद्द; आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

यूजीसी नेट परीक्षा रद्द; आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

केंद्राकडून यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

केंद्राकडून यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. युजीसी नेट परीक्षेत पेपर लीक झाल्याच्या शक्यतेने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने परीक्षाच रद्द केली आहे. आता नव्याने परीक्षा घेतली जाणार आहे. यावर आता अनेक प्रतिक्रिया येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने १८ जूनला घेतलेल्या NET-UGC परिक्षेत घोळ झाल्याची शंका लक्षात येताच, ती परीक्षा काल तातडीने रद्द केली. जो घोळ NEET च्या वेळेस झाला तो आता पुन्हा अंगलट येऊ नये म्हणून ही तातडीची 'कातडी बचाव' हालचाल केंद्राने केली. पण त्याने ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसानच झालं. ९ लाख विद्यार्थ्यांचे प्रचंड कष्ट आणि ह्या परिक्षेसाठी करावा लागलेला खर्च वाया गेला. मनस्ताप झाला तो वेगळाच. आता पुन्हा नव्याने परीक्षा द्यावी लागणार आहे.

यासोबतच ते म्हणाले की, 'परीक्षा पे चर्चा' करणाऱ्यांना घोळ घातल्याशिवाय देशभरात कुठलीही परिक्षा घेता येऊ नये ह्यापेक्षा मोठा विरोधाभास काय? युवकांच्या प्रश्नांचं फक्त भांडवल करणाऱ्या ह्या केंद्र सरकारने दिखाऊपणा बंद करून खरे प्रश्न सोडवण्यावर भर द्यावा. तरुणांच्या भविष्याशी खेळणं बंद करावं. आता ह्या परीक्षा रद्द झालेल्या तरुणांशी 'परीक्षा पे चर्चा' करतील का? असे आदित्य ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com