Satara Breaking: चोरट्यांनी नागठाणे येथील ATM दिले उडवून, जिलेटीनचा स्फोट करून लाखोंची रक्कम चोरण्यात चोरटे यशस्वी
प्रशांत जगताप | सातारा: साताऱ्यातील बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत नागठाणे येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे ATM जिलेटीनच्या कांड्यानी उडवून देत फोडण्यात आले असून लाखोंची रक्कम चोरण्यात चोरटे यशस्वी झाले आहेत. या घटनेने जिल्हा हादरून गेलाय. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून घटनास्थळी बोरगाव पोलीस दाखल झाले आहेत. ATM मधील लाखोंची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. मात्र रक्कम किती होती याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
जिलेटीन कांड्याद्वारे ATM फोडण्यात चोरट्यांना यश आले आहे. CCTV कॅमेऱ्यावर चोरट्यांनी काळा स्प्रे मारून ही लूट केली आहे. दरम्यान मागील 2 महिन्यांपूर्वी कराड येथील ATM जिलेटीन कांड्यानी फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला होता मात्र नागठाणे येथील ATM फोडण्यात चोरट्यांना यश आले आहेत. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली असून पोलीस पथके रवाना झाली आहेत.