ताज्या बातम्या
आता लवकरच मुंबईत समुद्राखालून बुलेट ट्रेन धावणार
आता लवकरच मुंबईत समुद्राखालून बुलेट ट्रेन धावणार आहे.
आता लवकरच मुंबईत समुद्राखालून बुलेट ट्रेन धावणार आहे. बीकेसी ते कल्याण शीळफाटा दरम्यान 21 किलोमीटर बोगदा तयार होत आहे. समुद्राखालील बोगद्यासाठी देशातील सर्वात मोठी मशीन वापरण्यात येणार आहे. ही सर्वात मोठी टीबीएम मशीन 13.1 मीटर व्यासाची असणार आहे.
आम्ही तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्प हाती घेण्यास सक्षम आहोत आणि ते वेळेवर किंवा वेळेच्या आधी पूर्ण करू शकतो, असं अफकॉन्सचे कन्स्ट्रक्शन प्लांट आणि इक्विपमेंट विभागाचे संचालकव्ही मणीवन्नन यांनी सांगितले. अफकॉन्स कंपनी या आर्थिक वर्षात विविध भूमिगत मेट्रो प्रकल्पांसाठी तब्बल 20 टनेल बोरिंग मशीन (TBM) तैनात करणार आहे. या वर्षी एकूण 17 टीबीएम तैनात केले जाणार आहे.