BRS NCP Sharad Pawar: BRS पक्ष आता राष्ट्रवादी SPमध्ये होणार विलीन?
महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील बीआरएस पक्ष आता राष्ट्रवादी SP मध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी राष्ट्रवादी SP मध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या 6 तारखेला पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडणार आहे. राज्यातील बीआरएसच्या प्रमुख नेत्यांची आज शरद पवारांसोबत बैठक संपन्न झाली. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात राज्यातील राजकारणात आपल्याला मोठे बदल झालेले पाहायला मिळणार आहे.
शरद पवारांना नेहमीच राजकारणातील मास्टरमाइंड असे संबोधले जाते. त्यामुळे विधानसभा निवडणुका आधी शरद पवारांची ही एक खूप मोठी खेळी आहे. आणि त्याचा फायदा त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे. अशी देखील सर्वत्र चर्चा चालू आहे. तसेच 6 ऑक्टोबरला शरद पवारांच्या बैठकीत बीआरसी पक्षातील सर्व पदाधिकारी शरद पवारांच्या पक्षात येणार असल्याची माहिती देखील येत आहे.
दरम्यान, बीआरएसचे नेते शरद पवार गटात आल्यास मराठवाडा भागात महाविकास आघाडीची ताकद वाढू शकते. तर आगामी निवडणुकांपूर्वी महायुतीला धक्का बसू शकतो. दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतही पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं मोठा विजय मिळवत बीआरएसचा दारुण पराभव केला होता.