BRSच्या संपर्कात वंचित? उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचं काय?
Team Lpkshahi

BRSच्या संपर्कात वंचित? उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचं काय?

राजकीय वर्तुळात BRS आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होण्याची चर्चा रंगत असताना वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी ही चर्चा फेटाळली आहे.
Published by :
shweta walge
Published on

राजकीय वर्तुळात BRS आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये युती होण्याची चर्चा रंगत असताना वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी ही चर्चा फेटाळली आहे. KCR यांच्या पक्षातून अजून प्रस्ताव नाही पण आलाच तर त्यावर आम्ही नक्की विचार करू असं सिद्धार्थ मोकळे यांनी लोकशाहीशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सिद्धार्थ मोकळे?

KCR यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही आहे. तेलंगणामध्ये पोटनिवडणुकीत आम्ही त्यांना सहकार्य करू शकतो. मात्र त्यांच्याकडून अद्याप कोणता प्रस्ताव आला नाही आहे, आला तर आम्ही नक्कीच त्यावर चर्चा करू योग्य तो निर्णय घेऊ. तेलंगणामध्ये आम्ही त्यांचे नंबर वाढू शकतो तिथे आमचे वोट बँक आहेत.

महाराष्ट्रामध्ये बी आर एस आम्हाला कसं सपोर्ट करू शकतो त्याचा फायदा आम्हाला कसं होईल हा सुद्धा एक प्रश्न आहे. मात्र बी आर एस कडून आम्हाला प्रस्तावाला तर आमच्याकडून नक्कीच योग्य ते पावलं उचलले जातील.

पुढे ते म्हणाले, शिवसेना ठाकरे गट आणि बहुजन वंचित आघाडी यांची युती दोन्ही नेत्यांनी येऊन जाहीर केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दोघे एकत्र येऊनच निवडणूक लढवणार आहोत. मात्र इतर पक्ष इतर घटक सोबत येत असतील तर त्यांना सोबत घेण्याची आमची भूमिका आहे. कोणताही पक्षाला सोबत घेताना सहकार्य त्यांना विचारात घेतलं जातं त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा नक्की होईल.

BRSच्या संपर्कात वंचित? उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीचं काय?
भिडेंना फाशी देणार का? नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल

मात्र दुसरीकडे वंचितने केवळ BRSची साथ द्यायचं ठरवल्यास उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीचं काय? असाही प्रश्न उपस्थित होतो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com