Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

Sharad Pawar | गुप्तचर विभागाने आधीच सतर्कतेचा इशारा दिला होता

सिल्व्हर ओकवरील हल्ला प्रकरणात मोठा गौप्यस्फोट
Published by :
Vikrant Shinde
Published on

8 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व राज्यातील सर्वात मोठ्या राजकीय नेत्यांपैकी एक शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) ह्यांच्या मुंबई येथील 'सिल्व्हर ओक' ह्या निवासस्थानी ST कर्मचाऱ्यांनी दगडफेक व चप्पलफेक केल्याने राज्यभरात एकच धांदल उडाली. दरम्यान, ह्या प्रकरणाबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, आता ह्या प्रकरणाच्या चौकशीमध्ये एक नवी व धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्य गुप्तचर विभागाने अशी घटना घडू शकते असा इशारा आधीच दिला होता अशी माहिती समोर येते आहे.

Sharad Pawar
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याबाबत मोठी बातमी; CCTV मध्ये...

नेमका कधी व काय इशारा:

मिळालेल्या माहितीनुसार साधारण तीन महिनेआधीच राज्य गुप्तचर विभागाने एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला होता. व शरद पवारांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची सूचना देखील दिली होती. दरम्यान, ह्या सर्व सुचना झोन II चे DCP योगेश कुमार (DCP Yogesh Kumar) यांना देण्यात आल्या होत्या. तरीही सिल्व्हर ओक निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नव्हता.

पोलिसांना पोहोचायला इतका उशीर का?

दरम्यान, ह्या साऱ्या प्रकरणामध्ये मीडिया सिल्व्हर ओकवर पोहोचली परंतू, पोलिसांना पोहोचायला उशीर का झाला हा सवाल आता उपस्थित केला जातोय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com